Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

लांजा : घराशेजारील बांध कोसळून मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

लांजा तालुक्यातील आरगाव बौद्धवाडी येथे घराशेजारील चिऱ्याचा बांध बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत एका मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसामुळे बांध कोसळून तो महिलेच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, २२ जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव कल्पना कमलाकर यद्रे (वय ३९, रा. आरगाव कुणणेगाव) असे आहे. त्या आरगाव बौद्धवाडी येथील मुकुंद कदम यांच्या घरी मजुरीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या.


घराशेजारील चिऱ्याचा बांध उभारण्याचे काम सुरू असताना कल्पना यद्रे या त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम करत होत्या. दरम्यान, सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली आणि बांध कोसळला. या दुर्घटनेत बांधाचा मोठा भाग त्यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री सुमारे ७.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. डी. जाधव अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे आरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *