Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : मारुती मंदिर परिसरातील लॉजमध्ये 34 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका लॉजमध्ये ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सायंकाळी खळबळ उडाली. आकाश दिलीप लोखंडे (वय ३४, रा. नवरेनगर, अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश लोखंडे हे कामानिमित्त रत्नागिरी येथे आले होते. वास्तव्यासाठी त्यांनी शहरातील मारुती मंदिर परिसरातील संसारे कॉम्प्लेक्समधील आसरा लॉजमध्ये खोली घेतली होती. दरम्यान, २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास लॉजमधील रूम क्रमांक ११४ मध्ये ते बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.


घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक ८०/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *