आर.व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित आर.आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली (व्यवस्थापन – रामराजे महाविद्यालय, दापोली) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला मुख्य प्रशासक प्रा. कुणाल मंडलिक, मुख्याध्यापिका आफरीन घनसार तसेच प्रमुख अतिथी म्हणून योगगुरु सविता मोरे आणि नीलम बुटाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी योग प्रशिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर नर्सरीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. योगगुरु सविता मोरे आणि नीलम बुटाला यांनी प्राणायाम, पद्मासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अनुलोम-विलोम, भ्रामरी, सूर्यनमस्कार तसेच शरीराला पोषक विविध व्यायाम प्रकारांचे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित योगाभ्यासाचे महत्त्व विशद केले. योगामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरभी बेलोसे यांनी केले, तर कृष्णाली बांद्रे यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन धनंजय यादव, सचिव डॉ. दशरथ भोसले, तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि रामराजे महाविद्यालयाशी संबंधित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













