Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

देवरुख : चेक बाऊन्स प्रकरणी 39.50 लाखांचा दंड, आरोपीला शिक्षा

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरुख शाखेच्या वाहन कर्ज प्रकरणात दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी देवरुख येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने आरोपी मुआज्जम महमद साटविलकर याला दोषी ठरवत ३९ लाख ५० हजार रुपयांचा दंड आणि साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या देवरुख शाखेकडून साटविलकर याला वाहन कर्ज मंजूर करण्यात आले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी त्याने बँकेला धनादेश दिला होता. मात्र संबंधित खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने धनादेश अनादरित (बाऊन्स) झाला.

यानंतर बँकेने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत देवरुख येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात दावा दाखल केला होता. या खटल्यात बँकेच्या वतीने ॲड. वाय. जी. चंदगडकर यांनी सादर केलेले दस्तऐवज आणि युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले.

सर्व पुरावे आणि नोंदींचा विचार करून न्यायालयाने मुआज्जम महमद साटविलकर याला दोषी ठरवत ३९.५० लाख रुपयांचा दंड आणि कैदेची शिक्षा सुनावली.

निर्णय देताना न्यायालयाने, “चेकद्वारे दिलेले आर्थिक आश्वासन पाळणे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे ही कायद्याची मूलभूत अपेक्षा आहे,” असे निरीक्षण नोंदविले. या निकालामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये धनादेशाच्या विश्वासार्हतेबाबत महत्त्वाचा संदेश गेल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *