रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला सध्या तडे गेले असून पूर्ण वाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. गेल्या तीन वर्षापासून येथील डोंगराला तडे गेले असून पावसाळ्यापूर्वी प्रशासन त्यांना स्थलांतरितेच्या नोटीस देते. परंतु त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे. हल्लीच घडलेली इर्शालवाडी घटना घडलेली अशी घटना येथे होण्याची प्रशासन वाट बघत आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. कोकणात सध्या पावसाला जोर असून अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील काही घरांना तडे देखील गेले आहेत. स्मशानभूमीची जागा 3 फूट खचली आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात. असे असताना या हा हाडामासाच्या लोकांचा प्रशासनाने विचार करून येथील ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
रत्नागिरी : हरचेरी बौद्धवाडी येथील डोंगराला तडे; ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल
Recommendation for You

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा जागर व्हावा, तसेच मंदिरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असाव्यात,…

कोकण रेल्वे मार्गावरील असुर्डे बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या ४१ वर्षीय प्रौढाला हॉलिडे स्पेशल रेल्वेची…

चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी केल्याप्रकरणी तसेच वाहन बाजूला…

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरात गणपती सजावटीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी…






