Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली प्रशालेत 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

banner 468x60

दापोली : ‘ज्ञानदीप’ दापोली संस्थेच्या ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली या प्रशालेत रविवारी (दि. २१ जून २०२६) १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.

banner 728x90

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई मेहता होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून योग मार्गदर्शक कोळेकर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक मधुकर मोरे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ७ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी योग मार्गदर्शक कोळेकर यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व अधोरेखित करत शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयुक्त आहे, याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षक विकास पाटील यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगासने करून योगदिन साजरा केला.

अध्यक्षा सरोजताई मेहता यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेत सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असा संदेश त्यांनी दिला.

मुख्याध्यापक मधुकर मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे कौतुक करत योग, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक रुपेश जाधव यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *