Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : गॅस एजन्सीसमोर ज्येष्ठ नागरिकाचा चक्कर येऊन मृत्यू

banner 468x60

दापोली शहरातील एच.पी. गॅस मेहेंदळे एजन्सी येथे माहिती घेण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम शंकर शेडगे (वय ६५, मूळ रा. आवाशी भावईवाडी, पो. टांगर, ता. दापोली, सध्या रा. शिवाजीनगर, दापोली) हे १८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता दापोली येथील एच.पी. गॅस मेहेंदळे एजन्सीमध्ये काही माहिती घेण्यासाठी रिक्षाने गेले होते.

यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते तेथेच कोसळले. घटनेनंतर रिक्षाचालक व परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मंगेश गंगाराम शेडगे यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ५१/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *