Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

गुहागरमध्ये खाडीत बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, मद्यप्राशन करून मित्रांसोबत पोहताना घडली घटना

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पडवे-तवसाळ परिसरात खाडीत पोहताना बुडाल्याने एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १५ जून) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मृत युवकाचे नाव संजोग शशिकांत सुर्वे (वय ३५, रा. पडवे भंडारवाडा, ता. गुहागर) असे आहे. याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजोग सुर्वे हे त्यांचे मित्र निखिल सुर्वे, विनायक गडदे आणि अक्षय सुर्वे यांच्यासोबत तवसाळ परिसरात गेले होते. चौघांनी मद्यप्राशन केल्यानंतर तवसाळ फेरीबोट परिसरात जेवण केले. त्यानंतर महामाई सोनसाखळी गावदेवी मंदिरालगत असलेल्या खाडीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले.

पोहत असताना संजोग सुर्वे यांना अचानक गटांगळ्या येऊ लागल्या आणि ते पाण्यात बुडू लागले. मित्रांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढले. मात्र त्यावेळी त्यांच्या नाक व तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. मित्र अक्षय सुर्वे यांनी त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने ॲम्ब्युलन्सच्या मदतीने त्यांना हेदवी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.

हेदवी येथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून अधिक उपचारासाठी पुढील वैद्यकीय केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संजोग सुर्वे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुहागर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २३/२०२६ अंतर्गत बीएनएसएस कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पडवे आणि तवसाळ परिसरात शोककळा पसरली असून संजोग सुर्वे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *