चिपळूण तालुक्यातील मिरजोळी मुस्लिम अंजुमन मुंबई संचालित National English Medium School & Junior College येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात Deputy Headmistress, English Teacher, Social Science Teacher, Information Technology Teacher, Biology Teacher आणि Account Teacher या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती Pre-Primary, Primary आणि Higher Secondary विभागांसाठी करण्यात येणार आहे.
अर्जदारांकडे B.A./B.Sc. B.Ed., B.Sc. B.Ed., M.Sc. B.Ed. किंवा M.Com. B.Ed. यापैकी संबंधित शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. Deputy Headmistress पदासाठी किमान पाच वर्षांचा अध्यापन किंवा प्रशासकीय अनुभव अपेक्षित आहे.
इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या तसेच अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज, सविस्तर बायोडाटा, पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींसह 16 जून 2026 पूर्वी कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावेत.
अर्ज सादर करण्याची वेळ : सकाळी 10.00 ते दुपारी 3.00
पत्ता :
National English Medium School & Junior College,
मिरजोळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
संपर्क : 9096001855 / 9049585345
संस्थेने पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













