Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : पोलिसांची मोठी कारवाई, गांजासह दोघे जेरबंद , 66 हजारांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

दापोली शहरात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत दापोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८०० ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. ११ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान दापोली प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यालगत संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातील सुझुकी अॅक्सेस (एमएच-०८-बीजे-१९१२) या दुचाकीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनाच्या डिकीत गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला.

या प्रकरणी रेहाना जमिर काझी (वय ५०, रा. रामराजे कॉलेजसमोर, दापोली) आणि समीर मोहम्मद शेख (वय ४६, रा. कोंकंब आळी, दापोली) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १६ हजार रुपये किमतीचा ८०० ग्रॅम वजनाचा गांजा तसेच ५० हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस दुचाकी यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) आणि २९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी सी. सान्वी स्वप्नील पाटेकर यांनी दिली आहे.

दापोली पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून, संबंधित अंमली पदार्थाचा स्रोत, पुरवठा साखळी तसेच आणखी कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला दापोली पोलिसांनी आणखी गती दिल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *