Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : बेकायदा गावठी दारूवर पोलिसांचा छापा, एकावर गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यात बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून, दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळकी येथे गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळकी ते आगरवायंगणी गावांच्या सीमेवरील बांधाच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने १० जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान दिनेश बाबु दवंडे (वय ४०, रा. कळकी शिगवणवाडी, ता. दापोली) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ६ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ६२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार अजित गोपाळ गुजर यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दापोली तालुक्यात बेकायदा दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *