Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर :अंजनवेलच्या लेकीची भरारी;सायली खडपे ‘एलएलबी’ परीक्षेत उत्तीर्ण!

banner 468x60


जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अंजनवेल येथील एका शेतकरी कन्येने मुंबईत शिक्षण घेत वकिलीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. अंजनवेल येथील शेतकरी संदीप खडपे यांची कन्या कू.सायली संदीप खडपे हिने ‘एलएलबी’ LLB परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.


​वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंजनवेल येथे शेती करून,अपार कष्टाने मुलीला मुंबईत उच्च शिक्षणासाठी पाठवले होते. सायलीनेही वडिलांच्या कष्टाचे चीज करत वकिलीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन त्यांचे वकील बनवण्याचे स्वप्न साकार केले आहे.


​सायलीच्या या यशाची दखल घेत शृंगारतळी व पाटपन्हाळे येथील मान्यवरांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. शृंगारतळी येथील पवार हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र पवार, उद्योजक नासीम साल्हे आणि पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असीम साल्हे यांनी सायलीचे मनापासून अभिनंदन करून तिच्या पुढील वकिलीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलीने मुंबईत जाऊन मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.


​या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र पवार, पाटपन्हाळेचे उपसरपंच आसिम साल्हे, उद्योजक नासीम साल्हे, सायलीचे वडील संदीप खडपे, गजानन जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे आणि मयुरेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सायलीच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *