Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : तालुक्यात डंपर पलटी होऊन 22 वर्षीय चालकाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुकीवली येथील खाण परिसरात डंपर पलटी होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून सनिल सखाराम पवार (वय ३९, रा. चिंचघर-दस्तुरी, ता. खेड) यांनी तक्रार दिली आहे.

माहितीनुसार, नितीन विजय पवार (वय २२, रा. दस्तुरी-चिंचघर, ता. खेड, सध्या मळरा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हा डंपर (एमएच ०८ डब्ल्यू ८४१७) चालवत होता. वेरळ येथील क्रशरमधून ग्रीट पावडर भरून तो सुकीवली येथील खाणीत आला होता. ग्रीट पावडर खाली करण्यासाठी डंपर मागे घेत असताना निष्काळजीपणा व मागील बाजूकडे दुर्लक्ष झाल्याने डंपर थेट खाणीत पलटी झाला.

या भीषण अपघातात चालक नितीन पवार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *