Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर : किरकोळ वादातून मारहाण, महिलेच्या बोटाचा तुकडा चावून तोडल्याचा आरोप, “माझा नवरा असताना मी कशाला जाईन?” यावरून झाला वाद

banner 468x60

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील गुढेकरवाडी परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीने महिलेच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन त्याचा तुकडा तोडल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ ते ३ वाजण्याच्या दरम्यान गुढेकरवाडी, वेळणेश्वर येथे घडली. याप्रकरणी शालिनी शरद इतापे (वय ४५, रा. गुढेकरवाडी, वेळणेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी संदीप बाळू गुढेकर (वय ३५, रा. गुढेकरवाडी, वेळणेश्वर) हा मद्यधुंद अवस्थेत फिर्यादींच्या जवळ आला. त्यावेळी त्याने फिर्यादींना उद्देशून, “तुझा नवरा असताना तू दुसऱ्यासोबत का जातेस?” असा जाब विचारला. त्यावर फिर्यादींनी, “माझा नवरा असताना मी दुसऱ्यासोबत कशाला जाईन?” असे उत्तर दिले.

या उत्तराचा राग आल्याने आरोपीने आक्रमक भूमिका घेत फिर्यादी, त्यांचे पती शरद भिकाजी इतापे तसेच शेजारी राजेंद्र संभाजी गुढेकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने तिघांनाही शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मारहाणीदरम्यान आरोपीने शालिनी इतापे यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला चावा घेतल्याने बोटाचा काही भाग तुटून गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

घटनेनंतर शालिनी इतापे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ५०/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११७(२), ११५(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील किरकोळ शाब्दिक वादातून इतकी गंभीर घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *