Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : कारची रिव्हर्स ठरली जीवघेणी, 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू, कारचं चाक डोक्यावरून गेल्याने मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवरील लेमन ट्री हॉटेलच्या आवारात सोमवारी (दि. ८ जून) सायंकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात ३ वर्षे ८ दिवस वयाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास सान्वी गणपती राठोड ही आपल्या कुटुंबासोबत हॉटेल परिसरात होती. ती वडाच्या झाडाखाली झोपलेली असताना आरोपी बापू हिरामण पवार (रा. सुतारकोड-जालगाव, ता. दापोली) यांनी त्यांच्या ताब्यातील क्रेटा कार (MH 08 AX 5887) रिव्हर्स घेताना निष्काळजीपणे व अविचाराने वाहन चालविल्याचा आरोप आहे. यावेळी गाडी सान्वीच्या डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी सान्वीचे वडील गणपती प्रेम राठोड (वय ३८, सध्या रा. खेडर्डी फाटा, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सान्वी गणपती राठोड हिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *