Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : आंबडसमध्ये ग्रामसभेनंतर जबर हाणामारी, डोकं फोडलं, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबडस गावातील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेनंतर निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली असून आठ जणांविरोधात खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. ५ जून २०२६) रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आंबडस ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सुरू होती. ग्रामसभा सुरू असताना काही ग्रामस्थ आणि फिर्यादी सभागृहाबाहेर आले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही वेळातच उग्र बनला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

या प्रकरणातील आरोपींनी फिर्यादी अमोल अशोक खेडेकर (वय ३२, रा. आंबडस गवळवाडी) तसेच संतोष विठ्ठल करंजकर यांना स्टीलच्या रॉडने तसेच हातापायांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत अमोल खेडेकर यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

दरम्यान, अमोल खेडेकर यांच्यावर होत असलेली मारहाण थांबविण्यासाठी त्यांचे भाऊ अनिल खेडेकर, वहिनी आदिती खेडेकर तसेच वडील अशोक खेडेकर घटनास्थळी धावून आले. मात्र, त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी तुकाराम करंजकर, रोहित करंजकर, संदेश खताते, संदीप करंजकर, विशेष करंजकर, चंद्रकांत करंजकर, संजय करंजकर आणि दिनेश करंजकर (सर्व रा. आंबडस, नक्वाडी) यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसभेनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. तपासाअंती घटनेमागील नेमके कारण आणि वादाची पार्श्वभूमी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *