दापोली तालुक्यातील जालगाव येथे कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून दोन भावांवर हल्ला केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी प्रकाश पवार (वय ३२, रा. नवशी शिगवणवाडी, ता. दापोली) यांना ५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी प्रमोद बजीरंग साळंखे (रा. मराठी शाळेजवळ, जालगाव, ता. दापोली) याने फोन करून त्यांच्या बहिणी मनिषा दयानंद चव्हाण आणि मेहुणे दयानंद सर्जेराव चव्हाण यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आपल्या घराजवळ बोलावले.
सनी पवार हे त्यांचे भाऊ सचिन प्रकाश पवार यांच्यासह घटनास्थळी गेले असता आरोपीने त्यांच्याशी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जवळ असलेल्या फायटरने सनी पवार यांच्या डाव्या कानाजवळ व डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सचिन पवार यांनाही ओठावर मारहाण करून जखमी करण्यात आले.
यावेळी आरोपीने “तुम्हा दोघांना बघून घेतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत सनी पवार व सचिन पवार हे दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११५/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ तसेच भादंवि कलम ३२४, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलिस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













