Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 1.23 कोटींची फसवणूक, दिल्लीतील आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी केली अटक

banner 468x60

बेंगळुरू पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची भीती दाखवत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीतील एका आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क साधून त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यामधून ३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याची भीती दाखवून चौकशीच्या नावाखाली वेळोवेळी पैशांची मागणी केली.


दि. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादींकडून विविध व्यवहारांद्वारे एकूण १,२३,००,००० रुपये उकळण्यात आले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हा गुन्हा सायबर फसवणुकीशी संबंधित आणि संवेदनशील स्वरूपाचा असल्याने सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण, आर्थिक व्यवहारांचा मागोवा आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान दिल्ली-नोएडा येथील गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक व पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.


दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. “कोणीही स्वतःला पोलीस, सीबीआय, नॅशनल सिक्युरिटी विभाग किंवा अन्य शासकीय यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगून बँक खाते, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करत असेल, वैयक्तिक माहिती मागत असेल किंवा अकाउंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नये.

कोणतीही वैयक्तिक किंवा बँकविषयक माहिती शेअर करू नये आणि तात्काळ जवळच्या पोलीस ठाणे अथवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *