Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

दापोली : डिजिटल मीडियाचे संपादक अरविंद मांडवकर यांना राज्यस्तरीय ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर

banner 468x60

शिक्षण, साहित्य आणि डिजिटल माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दापोली डिजिटल मीडियाचे संपादक, शिक्षक, लेखक व माध्यमकर्मी अरविंद अनंत मांडवकर यांची राज्यस्तरीय ‘कोकण रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोकणदीप मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अरविंद मांडवकर हे शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात यशाची शिखरे गाठली आहेत.

साहित्य क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून ते कोकण मराठी साहित्य परिषद, दापोली शाखेचे सह-सचिव म्हणून कार्यरत आहेत. लेखन, पटकथालेखन आणि शॉर्ट फिल्म निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विषयांवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे.

तसेच ‘दापोली डिजिटल मीडिया’ या माध्यमातून त्यांनी स्थानिक घडामोडी, सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांची यशोगाथा आणि प्रेरणादायी घटनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. वस्तुनिष्ठ, सकारात्मक आणि लोकाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांनी समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कला, चित्रकला आणि संगीत यांची आवड जोपासत समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या अरविंद मांडवकर यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. ना. योगेशदादा कदम यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

अरविंद मांडवकर यांची ही निवड दापोली तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व पत्रकारितेतील योगदानाचा हा गौरव मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *