खेड : दुचाकीची गाईला धडक, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील फुरूस गावाला पोयनारशी जोडणाऱ्या रस्त्यावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३० मे रोजी घडली.


banner 728x90

प्राथमिक माहितीनुसार, विकास चिखलकर हे त्यांच्या ॲक्टिव्हा (MH 08 A 0741) दुचाकीवरून पाणी आणण्यासाठी फुरूसच्या दिशेने जात होते. फळसोंडा जामा मशीदजवळ पोहोचताच अचानक एक गाय रस्त्यावर आली. गाय समोर आल्याने त्यांना वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

या दुर्दैवी घटनेमुळे चिखलकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या अपघातानंतर ग्रामस्थांनी फुरूस–पोयनार मार्गावरील वाढत्या अपघातांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या मार्गावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच हा रस्ता फळसोंडा मोहल्ल्याच्या वस्तीमधून जात असल्याने लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत गावकरी लवकरच प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे समजते.

याशिवाय, परिसरात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे या मार्गावर अनेक अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत ठोस उपाययोजना करून मोकाट जनावरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *