अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या वेदा परेश सरफरे हिने जलतरण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये भारतातील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. केवळ १० मिनिटे ८ सेकंदांत १०० मीटर अंतर पोहत पूर्ण करत तिने हा विक्रम आपल्या नावे केला.
वेदाच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत Kiran Samant यांनी वेदा आणि तिच्या पालकांची भेट घेत विशेष सत्कार केला. यावेळी त्यांनी वेदाच्या धाडसी आणि प्रेरणादायी कामगिरीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार सामंत यांनी वेदाच्या यशामागील तिचे वडील परेश सरफरे आणि कुटुंबीय यांच्या मेहनतीचाही गौरव केला. भविष्यात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदविण्याचे वेदाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शुभेच्छा देत अशा गुणी आणि प्रतिभावान मुलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी सरफरे कुटुंबीयांसह विविध मान्यवर उपस्थित होते. वेदाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













