Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : पोल्ट्रीच्या वादातून वृद्धेला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कापसाळ मधलीवाडी येथे शेजारील पोल्ट्री फार्मच्या तक्रारीवरून निर्माण झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून दुखापत करण्यात आली असून, तिच्या मुलालाही धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

banner 728x90

ही घटना १४ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. कापसाळ मधलीवाडी येथील पीडित महिलेने आपल्या घराशेजारी उभारण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममुळे होत असलेल्या त्रासाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून शेजारी राहणारे संदेश हरिश्चंद्र साळवी, मधुकर सदाशिव साळवी तसेच अन्य दोन महिला आरोपींनी पीडित कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी संदेश साळवी याने घरातील कौल उचलून वृद्ध महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारल्याने त्या जखमी झाल्या. यावेळी आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न पीडित महिलेचा मुलगा पायस कडवईकर करत होता. मात्र, दोन महिला आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावून फेकून दिला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कृती करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपी मधुकर साळवी याने पीडित कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याचेही समोर आले आहे.

या मारहाणीत वृद्ध महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर पीडितेने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित चारही आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *