Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या, आजारपणाच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील खरवते बौद्धवाडी येथे एका ६२ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. अनिल गोविंद पवार असे मृत वृद्धाचे नाव असून, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गंभीर गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पवार हे काही वर्षांपासून गुडघेदुखीच्या तीव्र आजाराने त्रस्त होते. वाढते वय, सततच्या वेदना आणि हालचालींवरील मर्यादा यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन कठीण बनले होते. विविध उपचार करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने ते मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ झाले होते. सततच्या शारीरिक त्रासामुळे ते नैराश्यात गेले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


१३ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. बराच वेळ ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी खोलीत पाहिले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी तातडीने मदतीसाठी धावपळ केली; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.


या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *