Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून नारंगी फाट्यावर मध्यरात्री राडा, लोखंडी पाईप, बांबूने हल्ला, सहाजण जखमी

banner 468x60

खेड तालुक्यातील नारंगी फाटा परिसरात जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने आल्याने मध्यरात्री मोठा राडा झाला. या वादात लोखंडी पाईप, बांबू आणि इतर वस्तूंनी झालेल्या मारहाणीत दोन्ही गटांतील एकूण सहा जण जखमी झाले असून, खेड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास नारंगी फाटा येथे घडली. पहिल्या तक्रारीत फिर्यादी ऋतिक सुनील जाधव यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या भावाच्या वाहनात गुरे भरल्याच्या संशयावरून काही जणांनी वाहन अडवून जाब विचारला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपींनी ऋतिक यांच्या भावाच्या कपाळावर कोणत्यातरी वस्तूने वार करून जखमी केले. तसेच ऋतिक यांच्या खांद्यावर बांबूने मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी त्रुपेश निंबाळकर, रिक्षाचालक चव्हाण आणि खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध सुरू केला असून घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्रसाद प्रकाश बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह नारंगी फाटा परिसरात गेले होते. तेथे सूरज जाधव याला अडवून विचारणा केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. याचा राग आल्याने सूरज आणि ऋतिक जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, लोखंडी पाईपने हल्ला करून प्रसाद बर्गे यांना पुलावरून ढकलून दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या तक्रारीवरून जाधव बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या दुहेरी तक्रारींमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले असून नेमकी मारहाण कोणी सुरू केली, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संबंधितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *