खेड : रोटरी स्कूलच्या ऋषिकेश चव्हाणची इंडियन आर्मीमध्ये निवड; संस्थेकडून सत्कार

banner 468x60

खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचा माजी विद्यार्थी ऋषिकेश चव्हाण याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याने परिसरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भुमिका पटेल उपस्थित होत्या. ऋषिकेश चव्हाण याने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये पूर्ण केले. शिक्षणात सातत्याने उत्तम प्रगती करत त्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले होते.

शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने इंडियन आर्मी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली होती. या प्रवासात रोटरी स्कूलमधील शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर ऋषिकेशने आपले स्वप्न साकार करत इंडियन आर्मीमध्ये स्थान मिळवले आहे.

त्याच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्था चेअरमन बिपीन पाटणे तसेच मुख्याध्यापिका भुमिका पटेल यांनी ऋषिकेशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या यशाचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *