चिपळूण शहरात २०१२ सालापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी कार्यरत असलेली आपलं चिपळूण ही सर्वस्पर्शी संस्था आपल्या निःस्वार्थ कार्यपद्धतीमुळे विशेष ओळख निर्माण करत आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून समाजहितासाठी सातत्याने कार्य करणे हे संस्थेचे वैशिष्ट्य ठरले आहे. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य शिबिरे, निराधार व्यक्तींना मदत, निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संरक्षण, शहर सुशोभीकरण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी व वृद्धांना सहाय्य अशा विविध क्षेत्रांत संस्था उल्लेखनीय योगदान देत आहे.
दि. ९ मे रोजी खेंड, चिपळूण येथील स्प्रिंग क्लिनिकमधील संस्थेच्या अधिकृत कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत आगामी वर्षासाठी विविध सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यात आला. चिपळूण शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी तसेच नदी-नाले संवर्धन कार्यकर्त्यांसोबत लवकरच सार्वजनिक चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संस्थेमार्फत कोकणातील परंपरा व संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तकांची रोटेशन पद्धती, गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिरे, गड-किल्ले भ्रमंती, पशु-पक्षी निरीक्षण, वृक्षलागवड तसेच कार्बन क्रेडिट योजनेबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. याशिवाय आरोग्य, मनःशांती, निसर्गोपचार, ध्यान आणि मानसोपचार या विषयांवरही उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीच्या शेवटी गेल्या १४ वर्षांपासून संस्थेचा कार्यभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. मावळते अध्यक्ष उदय ओतारी यांनी पुढील पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
नवीन कार्यकारिणी :
अध्यक्ष – डॉ. यतिन जाधव
कार्याध्यक्ष – संतोष देशमुख
उपाध्यक्ष – प्रशांत पाटेकर, मनोज जाधव
सचिव – उदय ओतारी
सहसचिव – प्रशांत देवळेकर
खजिनदार – फैय्याज देसाई
सहखजिनदार – राजू दरेकर
कार्यकारिणी सदस्य – जितेंद्र सुर्वे, निहार जोशी, मंगेश गोंधळेकर, प्रसन्न आवले, विशाल जानवलकर आदी
ही संस्था महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून लवकरच महिला व पुरुष सर्वसाधारण सभासदांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान सचिव उदय ओतारी यांनी दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













