चिपळूण : महाराष्ट्र हायस्कूलची विद्यार्थिनी सना सुर्वे 92 टक्के गुणांसह शाळेत प्रथम

banner 468x60

महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थिनी सना जलील सुर्वे हिने दहावी परीक्षेत ९२ टक्के गुण संपादन करत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयात तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

banner 728x90


सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सनाने हे यश मिळवले आहे. शालेय जीवनात विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतानाही तिने अभ्यासाकडे विशेष लक्ष देत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राहिली असल्याची भावना शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली आहे.
सनाच्या यशामुळे तिच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण असून मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून तिचे कौतुक केले जात आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूण अर्बन बँक चे माजी व्हाइस चेअरमन करामतशेठ मिठागरी यांनी सनाचे अभिनंदन केले. त्यांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *