Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

संगमेश्वर : तालुक्यातील घरफोडीचा पोलिसांकडून छडा, जावईच निघाला चोर

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदेवाडी येथील घरफोडी प्रकरणाचा देवरुख पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणात घरमालकाच्या जावयालाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरी केलेले सोन्याचे दागिने आरोपीने बँकेत गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी परिसरातील रहिवासी संतोष दौलत पाल्ये यांच्या घरात २४ जानेवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत चोरीची घटना घडली होती. घरातील बंद कपाटातील एक सोन्याचा हार आणि एक चैन अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. कपाटाचे कुलूप न तोडता अत्यंत शिताफीने ही चोरी करण्यात आली होती. चोरीचा प्रकार लक्षात येताच संतोष पाल्ये यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना घरातील व्यक्तीवर संशय आला. तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशीच्या आधारे संतोष पाल्ये यांचा जावई सचिन दत्तात्रय नाखरेकर याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले असून, चोरी केलेले दागिने त्याने बँकेत गहाण ठेवल्याची माहितीही उघड झाली आहे. देवरुख पोलिसांनी आरोपी सचिन नाखरेकर याला अटक केली असून, चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *