Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई, 42 हजारांच्या ब्राऊन शुगरसह एकाला अटक

banner 468x60

रत्नागिरी शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ४२ हजार रुपये किमतीच्या ब्राऊन शुगरसह एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीवर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांची खरेदी-विक्री वाढत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.


२७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांचे सहकारी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते. यावेळी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या गगनगिरी मठ रोड परिसरात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ब्राऊन हिरॉईन (ब्राऊन शुगर) सदृश अमली पदार्थ आढळून आला. या पदार्थाचे वजन सुमारे ३.५ ग्रॅम असून त्याची बाजारातील किंमत अंदाजे ४२ हजार रुपये इतकी आहे. तसेच अमली पदार्थ विक्रीसाठी वापरले जाणारे काही साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.


या प्रकरणी राहिल अजिज सुवर्णदुर्गकर (वय ३०, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू ठेवला असून, या मागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *