Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : 3 मे रोजी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा, महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक जल्लोष

banner 468x60

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत चिपळूण शहरात पारंपरिक आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक करणाऱ्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडणार आहे.

banner 728x90

पालखी नृत्य हा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील एक महत्त्वाचा आणि भक्तीभाव व्यक्त करणारा नृत्यप्रकार असून, या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात सादर होणाऱ्या या नृत्यस्पर्धेमुळे चिपळूणकरांना एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये अशी रोख पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, वेशभूषा, तालमेल अशा विविध घटकांवर आधारित वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कापसाळ (ता. चिपळूण), नगरसेविका कांचन शिंदे आणि. सुमित शिंदे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे आयोजन भव्य आणि यशस्वी होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालखी नृत्य पथकांनी सहभागी व्हावे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्र दिनाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव प्रभंजन पिंपुटकर व खजिनदार चंद्रशेखर सावले यांनी केले आहे.

या स्पर्धेमुळे चिपळूणमध्ये सांस्कृतिक वातावरणाला चालना मिळणार असून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम चिपळूणकरांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *