दापोली तालुक्यातील वळणे येथे पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी सायंकाळी ‘हॉटेल घरकुल’ समोर पोलिसांनी संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इर्टिगा (एमएच-०८-बीई-८०१९) या गाडीची झडती घेतली. झडतीदरम्यान गाडीतून सुमारे १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा RMD गुटखा तसेच ९६ हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी गुटखा व तंबाखूसह सुमारे ५ लाख रुपये किमतीची गाडी जप्त केली असून एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चिपळूण येथील रहिवासी आनंदा नागाप्पा पुजारी (वय ३६) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके अधिनियम तसेच भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून दापोली पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













