Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

खेड–दापोली मार्गावर गुटख्याची एर्टिगा कार जप्त, वाकवली येथे 2.40 लाखाचा गुटखा जप्त, पोलिसांची धाडसी कारवाई

banner 468x60

खेड–दापोली मार्गावर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारी एक एर्टिगा कार दापोली पोलिसांनी २७ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास जप्त केली. दापोली-खेड महामार्गावर वाकवली येथे 2.40 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. वाकवली परिसरात ही कारवाई करण्यात आली असून यामुळे अवैध तंबाखू वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे खेड–दापोली मार्गावर गुटख्याची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एक एर्टिगा कार संशयास्पद हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा आढळून आला. महाराष्ट्रात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी असताना हा साठा वाहतूक केला जात असल्याने पोलिसांनी तत्काळ कारसह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत किती आहे, तसेच या मागील मोठ्या रॅकेटचा संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

दापोली पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी आम्ही आताच ब्रेक केली आहे.
ही बातमी अपडेट होत आहे सविस्तर माहिती दिली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *