दापोली : अवकाळी पावसाचा तडाखा; पालगड परिसरात मुसळधार सरी, गोठा कोसळून बैल जखमी

banner 468x60

दापोली तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली आहे. २३ एप्रिल रोजी दुपारनंतर तसेच संध्याकाळच्या सुमारास तालुक्यातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. विशेषतः दमामे–पालगड परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पालगड येथे शिवराम बडवलकर यांचा गुरांचा गोठा पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक बैल जखमी झाला असून स्थानिकांकडून त्याला मदत करण्यात आली. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळून रस्ते अडथळित झाले होते. ग्रामस्थांनी तत्काळ पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

अवकाळी पावसामुळे शेती व जनावरांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *