Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : आडे येथून 24 वर्षीय तरुणी बेपत्ता

banner 468x60

तालुक्यामधील आडे गुहागर आळी दापोली येथून मयुरी जाधव ही २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १५ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरी जाधव ही भाऊ मेहुल याच्यासोबत दि. १५ जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास आडे येथून केळशी दापोली या बसने आंबवली येथे राहणारी त्यांची आत्या ममता भुवड यांच्या घरी जात असल्याचे सांगून निघाली होती.

मेहुल जाधव हा सालदुरे या ठिकाणी कामानिमित्त खाली उतरला. मयुरी जाधव ही एसटी बसने पुढे निघून गेली. मयुरी आंबवली येथे उतरल्याचे एसटी कंडक्टर याने सांगितले.

मयुरी तिच्या आतेकडे गेली नसल्याचे समजल्यामुळे तिचा भाऊ मेहुलने आसूद या ठिकाणी राहणारी मावशी अश्विनी रेवाळे हिच्याकडे गेली आहे का याचा तपास केला.

परंतु ती त्या ठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर मुंबई येथे राहणारे मामा अमित शिर्के यांच्याशी संपर्क करून मयुरी तिकडे आली का याची चौकशी केली.

ती तेथेही गेली नसल्याचे आढळले. या प्रकरणी भाऊ मेहुल याने दापोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *