गुहागर : पाचेरीसडा, पाचेरीआगर आणि कोळवलीसाठी बससेवा सुरु

banner 468x60

पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले होते.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या ठरावांना मान्यता मिळून बस चालू करण्यात आली आहे. यासाठी श्री. पाथरे, श्री शिंदे, श्री पवार, व रत्नागिरीचे श्री. काळे साहेब यांचे मोलाचं सहकार्य लाभले. याबाबत तीन गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

पाचेरीसडा कोंडवाडीतून वस्तीची गाडी सकाळी ६.३० वाजता सुटणारी काजरोळकर वाडी, पाचेरीआगर आबलोली मार्गे श्रृंगारतळी. तसेच पाचेरीसडा येथे सकाळी ८.३० वाजता येणारी नरवण- रत्नागिरी ही गाडी पाचेरीआगर, पाचेरीसडा पाणबुडी मार्गे रत्नागिरीला रवाना होणार आहे.

तसेच रत्नागिरी वरुन परतीची गाडी दुपारी २ ते २.३० वाजता सोडल्यास परतीच्या प्रवासाची गैर सोय दुर होईल.

तसेच भातगांव-मुंबई, किंवा भातगांव-विरार गाडीची सोय झाल्यास भातगांव पासून सर्व गावांना त्याचा फायदा होईल. तरी सहकार्य लाभावे, अशी विनंती ग्रामस्थांनकडून करण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *