Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

मंडणगड : आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड बससेवा सुरू

banner 468x60

दापोली : मंडणगड आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड अशी नवीन एसटी बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली. या नव्या बससेवेचे दापोलीत उत्साहात स्वागत करण्यात आले.

या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे, दापोली-मंडणगड एसटी प्रवासी मित्र संघटनेचे अध्यक्ष व कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे राज्य सचिव शैलेंद्र केळकर, प्रवासी संघटनेचे खजिनदार आसिफ खलपे, पत्रकार मंगेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन, चालक-वाहक तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या बससेवेमुळे दापोली, खेड आणि चिपळूण मार्गे नांदेडकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *