दापोली करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत उत्कृष्ट कामगिरी केली असून, शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
या परीक्षेत कु. दिव्यांशी नरेंद्र परदेशी हिने 95.4 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. सृष्टी सदाशिव कुंभार हिने 92 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. श्लोक सुदर्शन रांगळे याने 91.8 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
शाळेचे चेअरमन सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका. रितू मेहता यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकवृंदानेही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
या शानदार निकालामुळे परिसरात सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचे सर्वत्र कौतुक होत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून शाळेने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













