Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड : राज्यस्तरीय सिंधूरत्न भूषण कबड्डी चषक अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे संघाने पटकावला , अनिकेत स्पोर्ट क्लबचा शानदार विजय

banner 468x60

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार Narayan Rane यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेंगुर्ला येथे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय ‘सिंधूरत्नभूषण चषक’ कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने जय मानसेश्वर कबड्डी संघ, वेंगुर्ला यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

banner 728x90


या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित १६ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे या संघाने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपांत्य फेरीत त्यांनी स्वराज्य स्पोर्ट क्लब, चिपळूण या बलाढ्य संघावर मात करत अंतिम फेरीत धडक मारली.


अंतिम सामन्यात अनिकेत स्पोर्ट क्लबचा सामना एस. एम. स्पोर्ट्स क्लब, कुडाळ या संघाशी झाला. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत अनिकेत स्पोर्ट क्लबने ३० विरुद्ध २५ अशा गुणफरकाने विजय मिळवत ‘सिंधूरत्नभूषण चषक’ आपल्या नावावर केला.


स्पर्धेत उत्कृष्ट पकडीसाठी कुमारी समरीन बुरोंडकर हिला गौरविण्यात आले, तर अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धी चाळके हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संघातील राष्ट्रीय खेळाडू कुमारी तस्मिन बुरोंडकर, सायली शिंदे, सलोनी महाडिक, वंशिका कांचावडे, वैशाली जाधव, समीक्षा शिंदे, जान्हवी शिंदे, श्रावणी जाधव आणि मनीषा राठोड यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


या शानदार यशानंतर पंचक्रोशीतून सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच खेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे आणि कार्याध्यक्ष महेश भोसले यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


संघाला तेजा बैकर, सुभाष आंबेडे, दाजी राजगुरू, विलास बेंद्रे आणि सुजित फागे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे अनिकेत स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून भविष्यातही अशीच कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

संघाला तेजा बैकर, सुभाष आंबेडे, दाजी राजगुरू, विलास बेंद्रे आणि सुजित फागे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे अनिकेत स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून भविष्यातही अशीच कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *