रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करत दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. आज, १४ एप्रिल रोजी पहाटे साधारण २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश करून थेट दानपेटी लक्ष्य केली. दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेण्यात आली. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
या घटनेतील महत्त्वाचा धागा म्हणजे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची हालचाल कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, संशयितांची ओळख पटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती हे कोकणातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असल्याने या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













