Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

दापोली : भरदिवसा घरफोडी; 13 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

banner 468x60

दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भैरी देवीच्या यात्रेनिमित्त कुटुंबासह घराबाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा फोडून तब्बल १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे या चोरीप्रकरणी फिर्यादीने स्वतःच्या शेजाऱ्यावर संशय व्यक्त केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

banner 728x90

गव्हे पवारवाडी येथील रहिवासी अशोक गोविंद पवार (वय ५१) हे १० एप्रिल रोजी आपल्या कुटुंबीयांसह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले होते. दुपारी सुमारे ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड आणि चाकूच्या सहाय्याने छिद्र पाडले. त्यानंतर दरवाजा उघडून घरात प्रवेश करत बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडण्यात आले.

या लॉकरमधून १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये पाच विविध प्रकारचे गंठण, हार तसेच चपली हार यांचा समावेश आहे. एकूण चोरीचा आकडा १३ लाख २० हजार रुपयांवर पोहोचला आहे.

या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा फिर्यादी अशोक पवार यांनी शेजारी राहणारे राजू शंकर चोगले यांच्या खिशात त्यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली ‘माताजी कलेक्शन’ची दागिन्यांची पिशवी पाहिल्याचा दावा केला. या घटनेनंतर राजू चोगले आणि त्यांचा मुलगा राहुल राजू चोगले यांनीच ही चोरी केली असावी, असा संशय त्यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.

या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा करत असून संशयितांची चौकशी सुरू आहे.

भरवस्तीत, तेही दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे गव्हे पवारवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओळखीच्या व्यक्तींवर संशय व्यक्त झाल्याने गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *