दापोली : काजल शिगवणची मृत्यूशी झुंज तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाणी गावातील २४ वर्षीय काजल प्रकाश शिगवण सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिच्या उपचारासाठी तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता भासत आहे. आयुष्याच्या उमेदीच्या वयात असताना काजलला मेंदूतील मेड्युलोब्लास्टोमा (Medulloblastoma) या गंभीर आजाराने ग्रासले आहे.

काजलवर सध्या मुंबईतील Bombay Hospital येथे उपचार सुरू आहेत. तपासणीत तिच्या मेंदूमध्ये गाठी (नोड्युलर) आढळून आल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला असून, विलंब झाल्यास जीवाला धोका संभवतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, काजलचे कुटुंब अत्यंत सर्वसामान्य असल्यामुळे एवढी मोठी रक्कम उभारणे त्यांच्यासाठी कठीण ठरत आहे. कुटुंबीय आपल्या परीने प्रयत्न करत असले तरी आर्थिक अडचणींमुळे उपचारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

दरम्यान, काजलच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मदत करावी, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. वेळेत मदत मिळाल्यास काजलचे प्राण वाचू शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

📞 मदतीसाठी संपर्क:
नाव: काजल प्रकाश शिगवण
पत्ता: मु. पो. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी
Google Pay / PhonePe: 9370988343 (प्रणित शिगवण)
संपर्क: 9421449278 / 7303844939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *