दापोली : 19 एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन

banner 468x60

दापोली शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर क्रीडांगण, टेलिफोन एक्स्चेंज जवळ, दापोली येथे संपन्न होणार आहे.

banner 728x90

सध्याच्या सामाजिक परिस्थितीत हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. धर्म, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी तसेच समाजावरील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संमेलनात विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, समाजातील विविध प्रश्न, धर्मजागृती, सामाजिक एकता आणि संघटन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

“देव, देश आणि धर्मासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. आपण एकसंघ झालो तर कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो आणि समाज अधिक सक्षम व समृद्ध करू शकतो,” असे आवाहन संयोजक मिलिंद शेठ यांनी केले आहे.

या संमेलनात सहभागी होण्यासाठी दापोली तालुक्यासह परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *