महिला सक्षमीकरणासह महिला व तरुणींच्या कलागुणांना वाव देत त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघ व नगरपरिषद यांच्या सहकार्याने १२ व १३ एप्रिल रोजी येथील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात ‘नारी महोत्सव’ रंगणार आहे. सलग दोन दिवस महिलांच्या लोककलांचा जागर होणार आहे. 5 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करत त्यांना कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी बळ दिले जाणार आहे.
याचवेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नारी महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा . माधवी बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे, दुबईस्थित उद्योजक बशीर हजवानी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी, समाजसेवक रोहन विचारे, नगरसेवक मिनार चिखले यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत होईल
या उपक्रमांतर्गत महिला भजन मंडळाचे भजन, नृत्य, लावणी व अन्य लोककला सादर करण्याची मुभा महिला व तणींना दिली जाणार आहे. लोककलांचे जतन करणारी विविध महिला मंडळे लोककलेचा जागर करणार आहेत.
नृत्य व लावणी क्षेत्रात प्रवीण असणाऱ्या तरुणींनाही नृत्य करण्याची संधी मिळणार असून गायनही सादर केले जाणार आहे. या महिला कलावंतांचा पत्रकार संघाच्या वतीने प्रोत्साहनपर रोख रक्कम देवून यथोचित सन्मानही केला जाणार आहे. याचवेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी हनिफ घनसार यांच्या वाढदिवसाच्या उचित साधून 50 गरजू महिलांना दोन लाखांचे ‘विमा कवच’ दिले जाणार आहे.
महिलांच्या आर्थिक उत्कर्षासाठी नाट्यगृहाच्या आवारात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची उभारणीही करण्यात येणार असून यात महिला बचतगट व अन्य महिला सहभाग नोंदवणार आहेत. २० स्टॉल्सची मांडणी करण्यात येणार असून यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी. श्रेया कदम यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी त्यांच्याच हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल अन् हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा रहाटगाडा हाकणाऱ्या गरजू महिलांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष सौ.माधवी बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
यानंतर होममिनिस्टर कार्यक्रम होणार असून 5 महिलांना पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय व इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटवणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या नारी महोत्सवात महिलांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, कार्यक्रमप्रमुख. अश्विनी वडके यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, जेष्ठ सल्लागार व संयोजन समिती प्रमुख उत्तमकुमार जैन, श्रीकांत चाळके, सदानंद जंगम, सचिव किशोर साळवी, कार्यक्रमप्रमुख अश्विनी वडके, कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी, उपाध्यक्ष सुनील आंब्रे, इकबाल जमादार, संगम जाधव, सागर पाचरेकर यांच्यासह प्रयत्नशील आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













