कुडाळ : आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा वाढदिवस नाग्या महादू आश्रमातील मुलांसोबत साजरा

banner 468x60

कुडाळ – साद फाउंडेशनचे पदाधिकारी आर्किटेक्ट शंकर सावंत यांनी नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांसोबत आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी वसतिगृहाचे संयोजक उदय अहिर, फाउंडेशन अध्यक्षा तसेच प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक-सावंत, खजिनदार गौरेश नाईक, आणि प्रवीण कोरगावकर उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना बॅडमिंटनचे चार सेट, अब्दुल कलाम यांची पुस्तके, करिअर मार्गदर्शनासाठी उपयुक्त पुस्तके, मुलींना आवश्यक असणाऱ्या दैनंदिन वस्तू, तसेच १० किलो पोहे, १० किलो साखर, बिस्कीटपुडे आणि जुने कपडे दिले गेले. या देणग्या इंजिनीअर भाग्यश्री राऊळ-पावसकर, जर्मनीमध्ये कार्यरत, तसेच भोसले पॉलिटेक्निक येथील प्रोफेसर स्वप्नील राऊळ यांच्या मार्फत आश्रमाला भेट दिल्या होत्या.

एकूण ७५ मुलांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अविस्मरणीय होता. या प्रसंगी मुलांना त्यांच्या भविष्यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात आले, ज्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यातील दिशा मिळण्यास मदत होईल.

साद फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजातील गरजू मुलांसाठी आवश्यक वस्तू आणि खेळसाहित्य पुरवण्याबरोबरच, त्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शनही मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *