मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६ मध्ये जानवळे येथील इयत्ता तिसरीतील कु. रिद्धी बाळासाहेब लबडे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लिटिल चॅम्प इंग्लिश स्कूल, जानवळे येथे शिक्षण घेणाऱ्या रिद्धीने या परीक्षेत ३०० पैकी १८६ गुण मिळवत ६२ टक्क्यांसह ‘बी+’ श्रेणी प्राप्त केली. लहान वयातच तिने मिळवलेले हे यश तिच्या चिकाटी, मेहनत आणि अभ्यासू वृत्तीचे द्योतक मानले जात आहे.
रिद्धी ही अभ्यासू, जिज्ञासू आणि सातत्याने प्रयत्न करणारी विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. अभ्यासाबरोबरच विविध शालेय उपक्रमांमध्येही ती सक्रिय सहभाग घेत असते. यापूर्वीही तिने विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिके व पदके मिळवली आहेत. त्यामुळे शाळेत आणि परिसरात तिची ‘हुशार विद्यार्थीनी’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
या यशामागे तिचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक हेमंत शिरकर, मार्गदर्शक मुंडेकर शिक्षकवर्ग यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच तिचे वडील डॉ. बाळासाहेब लबडे यांनीही मुलीच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रिद्धीच्या या यशामुळे जानवळे तसेच आबलोली परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून इतर विद्यार्थ्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या यशामुळे स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











