Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

शृंगारतळी : पहिल्यांदा रोजा ठेवणाऱ्या चिमुरड्यांचा सन्मान

banner 468x60

अंजुमन दर्दमंदाने तालीमओ तरक्की’ या संस्थेच्या वतीने नुकताच एक अत्यंत कौतुकास्पद आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावर्षी पवित्र रमजान महिन्यात पहिल्यांदाच पूर्ण महिन्याचे उपवास रोजा पकडणाऱ्या लहान मुलांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
​या चिमुरड्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

लहान वयात मुलांनी दाखवलेल्या या संयम आणि श्रद्धेचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
​या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि धर्मगुरु उपस्थित होते. यामध्ये शृंगारतळी अंजुमनचे प्रमुख मौलाना युनूस मुल्लाजी, मौलाना इर्शाद मुल्लाजी, मौलाना मुश्ताक, मौलाना तौफिक, मौलाना नासीम साल्हे, मौलाना जैनुल आबीदिन, हाफिज मुस्तकिम आणि हाफिज अब्दुल वहाब, तसेच आसिम साल्हे, सफवान साल्हे, कलीम वनू, अशफाक मुल्लाजी, मुनाफ साल्हे, नूरमोहम्मद साल्हे, शोएब घारे यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


​संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि चिमुरड्यांच्या यशाचे संपूर्ण शृंगारतळी परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *