चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; CCTV मध्ये दोघे कैद

banner 468x60

चिपळूण शहरातील पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील तीन दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली.

या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे CCTV फुटेज ताब्यात घेतले असून त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे.

दरम्यान, CCTV फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *