Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागरात रानडुकराची शिकार, बंदूक आणि टेम्पोसह तिघे ताब्यात

banner 468x60

गुहागर तालुक्यातील गिमवी परिसरात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवार, २३ मार्च रोजी झालेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिमवी गावाच्या हद्दीत एक विना क्रमांकाचा ४०७ टेम्पो संशयास्पद अवस्थेत उभा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली असता, टेम्पोच्या हौद्यात मोठ्या रानडुकराची शिकार करून ठार मारलेल्या अवस्थेत आढळून आली. याच वाहनातून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली १२ बोअरची डबल बॅरल बंदूकही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी प्रसाद सुभाष सोमण, रोशन रमेश मोरे आणि संदीप वसंत गावडे (सर्व रा. गिमवी, ता. गुहागर) या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

संशयितांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई-पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान, गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्यासह एस. एस. सावंत, सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, राहुल गुंठे आणि कृष्णा इरमले यांच्या पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली.

वनविभागाच्या या कडक कारवाईमुळे अवैध शिकार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *