खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कार थेट जगबुडीच्या कठड्यावर, चालक थोडक्यात बचावला

banner 468x60

खेड मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीजवळ एक भीषण अपघात टळल्याची धक्कादायक घटना आज 19 मार्च सकाळी घडली. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने गाडी थेट नदीकाठच्या कठड्यावर जाऊन अडकली. काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

banner 728x90 banner 728x90

अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, आणि चालक बचावला आहे.

घटना घडताच महामार्गावरील इतर वाहनचालक व प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, तर काही काळ वाहतूकही मंदावली होती.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कठड्याकडे झेपावली. शेवटच्या क्षणी ब्रेक लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र गाडी कठड्यावर जाऊन अडकली.

स्थानिकांच्या मते, कार जर पुढे गेली असती तर ती थेट १०० ते १५० फूट खोल जगबुडी नदीच्या पात्रात कोसळली असती, ज्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा अपघात टळल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *