खेड तालुक्यातील बहिरवली ते खेड मार्गावर मुंबके येथील वळणावर एक भीषण रस्ते अपघात घडला असून, यामध्ये एका अल्पवयीन दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ६ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १३ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज मनोज मिरजोळकर (वय १७ वर्षे ६ महिने, रा. भरणे, बाईतवाडी, ता. खेड) हा आपल्या ताब्यातील एम.एच. ४५/ए.जी./९९०१ क्रमांकाची मोटारसायकल भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत दुर्गेश गणेश सुसविरकर (वय १७ वर्षे ९ महिने, रा. सुसेरी, ता. खेड) हा पाठीमागे बसला होता.
मुंबके येथील वळणावर गाडीचा वेग जास्त असल्याने स्वराजला वळणाचा अंदाज आला नाही आणि त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या भीषण अपघातात स्वराज मिरजोळकर याचा मृत्यू झाला, तर दुर्गेश सुसविरकर याला गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्वतःच्या मृत्यूस आणि मित्राच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत आरोपी स्वराज मिरजोळकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














